संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-दिवाळीच्या या पाच दिवसांच्या सणात लक्ष्मीपूजन प्रमाणेच सरस्वती पूजन अत्यंत महत्त्वाचे आहे.विद्येची आराध्य दैवत म्हणून सरस्वतीचे पूजन करण्यात येते अशाप्रकारे स्वरसाधना संगीत विद्यालयात सायंकाळी सरस्वती पूजन करून संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. विजय दुरतकर बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष शैलेश इंगोले,उपाध्यक्ष राजेंद्र वातीले,सागर विठाळकर यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.संगीत मैफिलीची सुरवात किरण सरवैय्या, सलोनी सूक्ते यांनी केली.रुद्रकुमार रामटेके,संदिप बिजेवार ,माधुरी कोसुळकर,विनोद ठाकरे , जितेंद्र जुनगरे यांनी सुरेल भक्तीगीते व नाट्यगिते सादर केली.यावेळी एकापेक्षा एक बहारदार मराठी गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप जितेंद्र जुनगरे यांच्या भैरवी रागातील गीताने करण्यातआला. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन बंटी अटारा यांनी केले.या सुरेल मैफिलीत तबला राजेंद्र वातीले व हार्मोनियमची जितेंद्र जुनगरे यांनी उत्कृष्टपणे साथसंगत करुन कार्यक्रमाला अधिकच रंगत आनली.श्रोत्यांनीही भरपूर प्रमाणात उपस्थिती लावली. चांगला प्रतिसाद दिला. सूर्यकांत ढोके, सुनील नगराळे,उमेश गोडे, यादवराव घोडे,अविनाश विरदंडे,यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी स्वरसाधना संगीत विद्यालयाचे संचालक जितेंद्र जुनगरे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात उपस्थितांनी दिवाळीच्या फराळाचा आनंद लुटला. दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हावे ही भावना श्रोत्यांनी आयोजकांना बोलून दाखवली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकांक्षा महल्ले, किरण डंभारे,प्रांजली देवुळकर,अनु महल्ले,तणिष्का गिरी,गिता जिवतोडे, वेदा गुंडावार,भरत जिवतोडे,मेघाली जुनगरे ,आरव कर्णेवार,पार्थ पावडे, आराध्या वातिले,खुशी गोडे, स्वरूप जुनगरे,शिवांशू ढाले अंश मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.


