दिगंबर तेलंगे
तालुका प्रतिनिधी कंधार
कंधार : तालुक्यातील हळदा येथील सिद्ध तीर्थ धाम आश्रमात वैकुंठवासी साहित्य महा उपद्या धार्मभूषण वट्टे मोड महाराज यांच्या सातव्या पुण्यसम्रान निमित्त दिनांक 14 11 2023 मंगळवार ते 21 11 2023 या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हे भागवत कथा सिद्धतीर्थ धाम हळदा या आश्रमामध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी महाराज या सभागृहात पांडुरंग शास्त्री हो करणे कर यांच्या रसाळ अमृतवाणीतून ऐकण्यास मिळणार आहे. व सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी 11 ते एक तुकाराम महाराज गाथा व भजन व दोन ते पाच पांडुरंग शास्त्री होकरनेकर यांची भागवत कथा 6 ते 7 ज्ञानेश्वरी महाराज हरिपाठ व संध्याकाळी आठ तीस ते दहा तीस पर्यंत हरिकीर्तन पहाटे चार ते सहा काकड आरती होणार आहे. या सदरील कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्ताने मोठ्या प्रमाणात घ्यावा अशी माहिती सिद्ध तीर्थ धाम हळदा या आश्रमाचे उत्तर अधिकारी महंत सद्गुरु ब्रम्हचारी श्री विशुध्दा नंदजी महाराज यांच्याकडून देण्यात आली आहे.


