संदीप रघुनाथ गुमटकर
शहर प्रतिनिधी चिखली
चिखली : येथील जनसेवा प्रतिष्ठान माळीपुरा यांच्या वतीने हिवरा आश्रम येथील नित्यानंद सेवा प्रकलपातील 60अनाथ मुलांना नवी कपडे,फटाके,मिठाई,एक महिना पुरेल एवढा भाजीपाला व मिष्ठान्न भोजन देऊन त्यांच्याचेहऱ्यावरओसंडूनवाहणाराआनंद फुलवून आगळी वेगळीदिवाळी साजरी केली.सामाजिकतेच तीव्र भान असलेल्या आणि सामाजिक बांधिलकी नसानसात भिनलेल्या तरुणांचा समावेश असलेल्या या जनसेवा प्रतिष्ठान ने अनेक महिन्यापासूनआश्रमातील लेकरांच्या डोईवर सुविधांच आभाळ ऊपलब्ध करून देण्याचा संकल्प केला असून तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कृतिशील धडपड करतआहेत वअनाथ मुलांच्या जग्ण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी सदैव तत्पर राहून कधी जीवनवश्यक वस्तू तर कधी भोजन पार्सल तर कधी शालेय साहित्य ऊपलब्ध करून देत हया सेवाभावी युवक बांधवांनी हया अनाथ मुलांवर आपल्या लहान भावासारख प्रेम करून आगळी वेगळी दिवाळी साजरी केलीआहे.सोशल मीडिया च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासनाऱ्या लोकांचा एक ग्रुप तयार करून दात्यांना विनम्र आवाहन करण्यात आले व त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही देवदूतानी सहयोग राशी, कपडे फटाके मिठाई व भोजन व्यवस्था केली व नित्यानंद परिवारातील मुलांसोबत चार तास दिवाळीचा आनंद साजरा केला.” दिवाळीचा एक दिवा अशा ठिकाणी जिथे दिवाळी माहीत नाही,,याओळींना मूर्त रूप देऊन अनाथ मुलांच्याअंधारलेल्याआयुष्यात दातृत्वाच्याअगणित पणत्या लावून त्यांच्या चेहऱ्यावरओसंडून वाहणाराआनंद फुलवून आगळी वेगळी दिवाळी साजरी करणाऱ्या जनसेवा प्रतिष्ठान च्या सर्व शिलेदरांप्रती अनंत शेळके यांनी कृतज्ञता व्यक्त केली.










