कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील ग्रामदैवत श्री संत सोनाजी महाराज यांची भव्य दिव्य यात्रा दि.27 नोव्ह.पासून सुरू होत आहे.यासाठी आज रथ बाहेर काढून सर्व गावकरी,सोनाजी महाराज विश्वस्त मंडळ,सर्व रथोत्सव स्वयंम सेवक,पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी महा आरती करून रथाचे दर्शन घेतले.हा रथ अतिशय प्राचीन असून पिंगळी येथील झांगोजी पाटील यांनी हा रथ नवस पूर्ण करून तयार करून घेतला आहे.या रथाला सर्व जण यात्रा मध्ये नारळाचे तोरण बांधून आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी सर्व भक्ती भावाने रथाची पुजा करुन रथाला प्रदक्षिणा घालत असतात. यासाठी सर्व गावकरी रथ बाहेर काढण्यासाठी येत असतात.