पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
मागील वर्षीप्रमाणे यंदाही के.आर.सी. अभ्यासिका कविकुलगुरु विश्वविद्यालय रामटेक येथे अभ्यास करणारे वाचनालयातून विविध प्रकारच्या सेवेत रुजू असलेले विद्यार्थी दिवाळीनिमीत्त सकाळी एकत्रित येऊन रामटेक जवळील मनसर येथील वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केली. यावेळी मोठ्यांचे आशीर्वाद घेत शुभेच्छा दिल्या.
यात नंदकिशोर चाफले,तुषार चव्हाण,रोहित देशमुख, रोशन वंजारी,अक्षय परिहार,सुमित अंबादे,श्रेयस टुले, समीर पाटिल,जितू मानकर,ऋषभ तिवारी,नचिकेत खडसे,सुमित वाडीवे,अमोल डहरवाल,रजत पोटे, शैलेश,अभिनंदन भोपे,धीरज मंदेवार,अनिकेत, विकास बागडे,प्रमोद ठाकरे, प्रवीण मसराम आदींचा समावेश होता. यातून समाजात एक चांगला संदेश जाईल जेणे करून सर्व आपल्या आनंद इतरांसोबत वाटत माणसा-माणसातील अंतर कमी होईल व प्रेम भाव वाढेल ही अपेक्षा व्यक्त केली.