विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी ‘विश्वकर्मा जयंती’ निमित्त ‘पीएम विश्वकर्मा’ योजना सुरू केली, ज्या अंतर्गत पारंपारिक कारागीरआणिशिल्पकारांना तारण न घेता कमी व्याजदरावर कर्ज सहाय्य प्रदान केले जाईल.ज्यातून व्यवसायात गुंतलेले कारागीर हे स्वतंत्र आणि आत्मनिर्भर भारताच्या खऱ्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळं या योजनेचा फायदा महिला आणि समाजातील दुर्बल घटकांना होईल,जेणेकरून ते स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होतील.
भारत देश विविध जाती धर्माचा व पंथाचा मिळून बनला आहे.त्यापैकी विशिष्ट समाजाचे लोक काही प्रकारच्या पारंपरिक व्यवसायात गुंतलेले असतात ते ग्रामीण समाजाचा आर्थिक कणा आहेत. अशा प्रकारचा एक समाज आपल्या देशात आहे तो म्हणजे विश्वकर्मा समाज.अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा समाजाच्या कल्याणासाठी उपयुक्ती अशी विश्वकर्मा कौशल सन्मान योजना नुकतीच सुरु केली आहे.यात १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण,आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे. कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढवून त्यांना अर्थीक संपन्न बनवणे.तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.योजनेत आर्थिक साहाय्य योजने अंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना ५ टक्के व्याजदरासह पहिल्या टप्यात १ लाख रु. तर दुसऱ्या टप्यात २ लाख रु. चे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे. योजनेची वैशिष्ट्ये व फायदे पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच आणि पंधरा दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच आयडी कार्ड प्रदान केले जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे ई व्हाउचर. प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह पहिल्या टप्यात एक लाख तर दुसऱ्या टप्यात २ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे. कोणाला लाभ घेता येणार आहे. होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपारिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.ज्यामध्ये विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 140 जातींचा,18 व्यवसायाच समावेश केला आहे.आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर प्रशिक्षण प्रमाणपत्र.या योजनेमुळे विश्वकर्मा समाजातील लोकांमध्ये रोजगाराचे प्रमाण वाढून बेरोजगारीचे प्रमाण कमी होणार आहे.तसेच हाताने वस्तू तयार करणारे लोक देखील बँक प्रमोशनद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांशी जोडले जातील.त्यामुळे हिंगोली लोकसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. तसेच लवकरच विधानसभा मंडल निहाय जनजागृती साठी भाजपा पक्षाची स्वतंत्र यंत्रणा आगामी काळात काम करणार आहे असे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी सांगितले.