अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
करंजी: पाथर्डी तालुक्यातील डोंगरवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी व सदस्य पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, उद्धव भाऊ गीते व आजिनाथ मामा गीते यांची सरपंच पदी व सदस्य पदी निवड झाली आहे. डोंगरवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये दिनांक ५/११/२०२३ रोजी झालेल्या मतदानामधून आज दिनांक ६/११/२०२३ मतदान मोजणी अखेर यांची सरपंच पदी व सदस्य पदी निवड झाली आहे. डोंगरवाडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पंचकोशीत असलेल्या सर्व ग्रामस्थांनी त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढून त्या दोघांचे स्वागत केले आहे. डोंगरवाडी मध्ये सर्व मतदारांनी यांच्या बाजूने मतदान करून त्यांना निवडण्याची परंपरा हस्तगत केली आहे. या सरपंच व सदस्य पदी निवड झालेल्या दोघांनी पाच वर्षे त्यांच्या सेवेत घालवण्याचे ग्रामस्थांना त्यांनी आश्वासन दिले आहे. व सर्व ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.