सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. ०५ नोव्हेंबर २०२३ बीड जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी बीड पोलिसांनी १४४ आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटना समर्थन करत असताना दि. ३० ऑक्टोबर २०२३ ते दि. ३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण चालू असताना अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा तर उडालाच पण या हिंसाचारातून खाजगी आणि शासकिय मालमत्तेचे नुकसान झाले आहे तसेच या हिंसाचारात बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि माझी लोकप्रतिनिधी यांच्या घरावरही दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली. या घटनांचे सी. सी. टीव्ही फटेज बीड पोलिसांना मिळाले असून आणि सर्व घटनाक्रमाचा तपास आढावा घेत बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात तब्बल ११ कोटी रूपयांचे नुकसान झाले असून हि नुकसानभरपाई आरोपींकडून करण्यात येणार याचा अहवाल आरोपींकडून तयार करून घेण्यात आला असून आरोपींनी बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचारात झालेली नुकसान भरपाई नाही दिली तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून पोलिस प्रशासन भरपाई करून घेणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी बीड पोलिसांनी १४४ आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.


