गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा : 3 नोव्हेंबर 2023 रोजी मलकापूर नांदुरा मतदार संघातील महावितरणच्या प्रलंबीत कामासंदर्भात श्री.विश्वासजी पाठक संचालक, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन बुलढाणा येथे बैठक पार पडली.यामध्ये आमदार श्री.राजेश एकडे यांनी मतदार संघातील प्रलंबीत असलेली महावितरणचे कामे तात्काळ मार्गी लावण्यात यावे अशा सुचना या बैठकीत दिल्या त्यामध्ये नांदुरा माळेगांव (गोंड) येथील प्रस्तावीत असलेले 132 के.व्ही.उप केंद्र लवकरात लवकर मार्गी लावावे, मतदार संघात काही भागामध्ये बरेच शेतकरी शेतामध्ये राहत असल्यामुळे अशा भागामध्ये कृषी फिडरवर एस.डी.टी. रोहीत्रांची व्यवस्था करुन देण्यात यावी. काही शेती पंपाचे व गावाचे रोहीत्र अतिभार असल्यामुळे अशा रोहीत्रांची क्षमता वाढून अथवा नवीन रोहीत्र वाढवून तातडीची उपाय योजना करण्यात यावी. नवीन प्रस्तावीत हिगणा काझी मलकापूर येथील 33 के.व्ही., वडगाव येथील 33 वसाडी 33 के.व्ही. हे उपकेंद्र लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे ३३/११ के.व्ही,मलकापूर, दाताळा,दसरखेड उपकेंद्रामध्ये अतिरिक्त 5 एम. चालू करण्यात यावे.