विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : उमरखेड तालुक्यातील धानोरा सा येथील बालाजी काळे पाटील यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आले. बालाजी काळे पाटील मागील १३वर्षा पासून सतत बिनविरोध निवडून येत आहेत .सर्वसामान्य माणसाला नेहमी न्याय देण्याची भूमिका पाटील यांनी घेतल्या मुळे गावातील नागरिकांनी पाटील यांची बिनविरोध निवड केली . या वेळी धानोरा गावचे सरपंच प्रकाश जाधव उप सरपंच अवधूत हमांद पोलीस पाटील ग्रामसेवक सुर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य गावकरी मंडळी उपस्थित होते.