प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.२५ ऑक्टोंबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज पासून पाथरी येथे देवनांद्रा सर्कल मधील सर्व गावांनी साखळी उपोषणात सुरुवात केलेली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी म्हणून मनोज ज रांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी देवनांद्रा सर्कलमधील सर्व मराठा समाज बांधवांनी आजपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत सरकारकडून ठोस लेखी आश्वासन मिळत नाही आरक्षणाचा जीआर मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील हे साखळी उपोषण सरकारला शांततेच्या मार्गाने ना झेपणार ना पेलणार अशा स्वरूपाचे असणार आहे. मनोज जरंगे यांनी सरकारला ३० दिवस दिले होते पुन्हा १० दहा दिवस दिले तरी पण सरकारकडून आरक्षणाच्या संदर्भात कुठलीच हालचाल दिसून आली नाही चाळीस दिवसात सरकारने कुठलाच निर्णय न घेतल्याने पुन्हा मनोज जरंगे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. सर्व मराठा समाज जरंगे पाटील यांच्या सोबत आहे हे साखळी उपोषणाच्या माध्यमातून देवनांद्रा सर्कल मधील सर्व गावांच्या वतीने हे उपोषण सुरू झाले. उपोषणा तत्पूर्वीमा. तहसीलदार पाथरी व.मा. पोलीस निरीक्षक पाथरी यांना रीतसर निवेदन देऊन उपोषणाला सुरुवात झाली आहे. हे उपोषण पाथरी पोखरणी पोहे टाकळी रोडवर सुरू आहे.











