दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारमध्ये दरबारी आणि ऐतिहासिक दसरा दरवर्षी उत्साहात साजरा होतो. यंदाही मोठ्या धूमधडाक्यात दसरा साजरा झाला. काळाच्या ओघात सर्व संस्थाने खालसा झाली आणि तेथील रुढीपरंपराही, मात्र जव्हार येथे गतस्मृतींना उजाळा देणारा दसऱ्याचा उत्सव जल्लोषात साजरा होतो. सुमारे सहाशे वर्षे परंपरेने जव्हारचा दसरा सुरू आहे.जव्हारचा असा हा दरबारी, वैभवशाली दसरा संस्थाने विलीन झाल्यानंतर त्याकाळच्या पद्धतीने साजरा होत नसला तरी नगर पालिकेमार्फत एक सांस्कृतिक परंपरा जोपासण्याच्या प्रयत्नातून दसरा साजरा होतो. पूर्वी श्रीमंत राजे साहेबांची पालखीची मिरवणूक निघत असे, आता त्याऐवजी अंबिका मातेचा चित्ररथ पालिकेमार्फत काढला जातो. जुना राजवाडा येथून तर हनुमान पॉइंटपर्यंत आजही मोठी मिरवणूक निघते. हजारोंच्या संख्येने परिसरातील आदिवासी जनता यात सहभागी होते.अशी होती प्रथा अश्विन शुद्ध प्रतिपदेस या उत्सवाला प्रारंभ होतो. जव्हारच्या प्रसिद्ध अशा जुन्या राजवाड्यात देवीचा गोंधळ होत असे, याच राजवाड्यात एका रात्री गोधळाच्या कार्यक्रमात वाद झाले, दगल झाली. सुमारे ७ माणसे मरण पावली. त्यामुळे ही प्रथा बंद पडून कोजागरीपासून ९ दिवस गोंधळाचा कार्यक्रम केला जाऊ लागला. नवमीचा होम झाल्यानंतर आधी रेड्याचा बळी दिला जात असे. त्यानंतर कोहळ्याचा प्रतीकात्मक बळी दिला जाऊ दिला लागला.दुसऱ्या दिवशी कुस्त स्त्यांचे आयोजन रात्रभर तारपानृत्य व ढोलनाचावर बेभान होऊन नाचण्याचा कार्यक्रम होत असतो. हा सोहळा पाहण्यासाठी लोक येत असतात. दसऱ्याच्या दुसया दिवशी पालिकेमार्फत कुस्त्यांचे आयोजन केले जाते. स्पर्धेसाठी नाशिक, घोटी, नगर, पुणे जिल्ह्यातील नामवंत मल्ल येत असतात.
” दसऱ्यादिवशी राजांची निघायची शाही मिरवणूक “
1) विजयादशमीच्या दिवशी पहाटे राजघराण्यातील व्यक्तीकडून पूजा अर्चा त्याचप्रमाणे शस्त्रपूजा, व अश्वपूजा, वाहनपूजा केली जात असे. सायंकाळी दसरा मिरवणुकीस सुरुवात होत असे. कुलदैवताचे दर्शन घेऊन तलवारीस वंदन करून राजे घोड्यांच्या बग्गीत स्थानापन्न होत पालखीची मिरवणूक निघत असे.२) ही मिरवणूक हनुमान पॉइंटवर जात असे. दसयाच्या मुहूर्तावर मुलुखगिरीला सुरुवात करण्याचे प्रतीक म्हणून आठही दिशांना वाण सोडले जात तेथे नवीन ध्वज चढविला जाई. जुन्या राजवाड्यातील कुलदेवतांसमोर सोने वाढली जात. नंतर श्रीमंत राजेसाहेबांना सोने देण्याचा जनतेचा कार्यक्रम होत असे.