दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा : तळोदा तालुक्यातील बऱ्याच खेडा गावांमध्ये पूर्वापार चाललेली रेड्याचा बळी देण्याची प्रथा आजही कायम आहे.अनेक गावांमध्ये दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ००.०५ वाजेनंतर रेड्याचा बळी देण्याची प्रथा आहे. विजयादशमीच्या दिवशी सर्वलोक आनंदात असतात एकमेकांचे दुःख विसरून एकमेकांची गळाभेट घेतात.याच दिवशी सायंकाळी प्रत्येक गावातील खेडेगावांमध्ये पोलीस पाटील विधिवत रेड्यासाठी लागणाऱ्या मोठ्या भोपळ्याचे फळ ज्याचा आकार साधारणत ५ ते ६ किलो एवढा असतो. अशा फळाला आनले जाते आणि त्या फळाला रेड्याचा आकार दिला जातो.अर्थात फळाचे चारही बाजूला खालील भागात पाय म्हणजेच काड्यांच्या साह्याने पाय तयार केले जातात. त्याबरोबर वरती दोन शिंग या पद्धतीने त्या फळाला रेड्याचा आकार दिला जात. त्या नंतर गावातील मारुती मंदिराजवळ त्या रेड्याची विधिवत पूजा केली जाते आणि त्यानंतर काही ठराविक व्यक्ती त्या रेड्याला गावाच्या मध्यभागी मिरवणूक काढून आणतात.गावाच्या चौकात आणून एका ठिकाणी त्याला स्थापित करतात. त्यानंतर गावातील पोलीस पाटील अथवा त्या ठिकाणातील एक वरिष्ठ व्यक्ती त्या रेड्याचा बळी देतो जेणेकरून त्या रेड्याला मारल्यानंतर रावणाचा वध झाल्याची भावना प्रत्येकामध्ये असते. ज्यावेळेस पोलीस पाटील किंवा वरिष्ठ व्यक्ती किंवा ज्याला मान आहे तो व्यक्ती रेड्याचा आपल्याकडील हत्याराच्या साह्याने त्याचे तुकडे करतो. त्यानंतर गावातील तरुण मंडळी ही आपल्याकडे असलेल्या धान्याच्या तोट्याच्या सहाय्याने त्या तुकड्यांवर हल्ला चढवतात आणि प्रत्येक जण त्या तुकड्यांना त्या ठिकाणी आपल्याकडे असलेल्या तोट्याच्या साहाय्याने मारतात त्यामुळे नंतर काही वेळानंतर ते तुकड्यांचे एकत्रीकरण केलं जातं व सर्व एकत्रित होतात आणि त्या तुकड्यांच्या विसर्जनासाठी करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील यांनी नेमून दिलेला व्यक्ती ते सर्व साहित्य टोपलीत भरतो आणि गावाच्या बाहेर नेऊन एका ठिकाणी टाकून येतो या पद्धतीने ही परंपरा आजही रूढ आहे. त्यानंतर गावातील नागरिक शमीच्या झाडाकडे जातात आणि शमीच्या झाडाची विधिवत पूजा केल्यानंतर त्या ठिकाणी सोनं घेऊन येतात सोनं म्हणजे आपट्याची पानं .ही आपट्याची पाने घरी घेऊन आल्यानंतर घरी जो व्यक्ती ते पान घेऊन येतो त्याची आरती ओवाळून पूजा केली जाते आणि त्याला घरात प्रवेश दिला जातो यानंतर तो व्यक्ती आपले नातेवाईक वगैरे यांना भेटण्यासाठी बाहेर जातो अशा पद्धतीने ही परंपरा आजही प्रत्येक गावात चालू आजही चालू आहे.
चौकोट
ग्रामीण भागात अश्या रितीने आजही रूढी परंपरा व संस्कृती जपली जातेय फक्त काळा नुसार व प्राणी पशु हत्या टाळावी म्हणून रेड्याच्या जागी भोपळा वापरला जातोय यातून ग्रामीण जनतेचे भूतदया संस्कृती व पशु प्रेम सुद्धा दिसून येते.











