संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड : येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामतीद्वारे घेण्यात येणारे वाहन परवाना शिबिर कोविड महामारीनंतर बंद होते हे शिबिर प्रत्येक आठवड्याला नियमित सुरू करावे यासाठी आमदार राहुल कुल यांच्या वतीने शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत होता त्यानुसार आजपासून दौंड एस. टी डेपो च्या आवारात या शिबिराला दौंड पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्याचा शुभारंभ आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करणयात आला.दौंड तालुक्यातील अनेक नागरिकांना वाहन परवाना काढण्यासाठी बारामतीला जावे लागत असून कोरना महामारीपूर्वी दौंड येथे सुरू असलेल्या शिबिर कोराना महामारीपासून बंद होते परंतु आज ते पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना वाहन परवाना काढण्यासाठी आता बारामतीला जावे लागणार नाही प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी नियमित हे शिबिर सुरू राहील. आज पहिल्याच दिवशी दिवसभरात शिबिरामध्ये सुमारे ५० हुन अधिक वाहन धारकांना परवान्यांचे वाटप करण्यात आले. दौंड शहरातील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व तालुक्यातील जनतेला या शिबिराचा फायदा होणार असून यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी केसकर , मोटार वाहन निरीक्षक साळोखे , सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक चोथे, खारतोडे आदी उपस्थित होते.










