शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि – 18 ऑक्टो.नूतन महाविद्यालय, सेलू येथे स्वा. रा. तीर्थ विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन खो- खो स्पर्धा संपन्न. खेळाडूंनी पोषक आहार घेणे अत्यंत आवश्यक असून, खेळासोबत शिक्षणा कडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची आज आवश्यकता आहे. आरोग्य व शिक्षणाकडे दुर्लक्ष करून विद्यार्थी सर्वोत्तम खेळाडू होऊ शकत नाही असे प्रतिपादन डॉ.मनोज रेड्डी क्रीडा संचालक, स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांनी केले.स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्या पीठ,नांदेड व नूतन महाविद्यालय,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 व 18 ऑक्टोबर रोजी आंतर महाविद्यालयीन खो- खो स्पर्धा नूतन महाविद्यालय,सेलू येथे घेण्यात आली. या स्पर्धेच्या उदघाट्न समारंभाप्रसंगी डॉ.रेड्डी बोलत होते. कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून डॉ. व्ही.के.कोठेकर सचिव ,नू.वि.शिक्षण संस्था,सेलू यांची उपस्थिती होती.या प्रसंगी मंचावर डॉ.यु.सी.राठोड प्राचार्य नूतन महाविद्यालय, सेलू,डॉ.शेषेराव धोंडगे चेअरमन, खो-खो स्पर्धा पुरुष गट),डॉ.पवन पाटील क्रीडा संचालक,के.के. एम,मानवत,मीनानाथ गोमचाळे ड झोन सचिव,डॉ. व्यंकट माने चेअरमन, खो-खो स्पर्धा महिला गट,डॉ. नागनाथ गजमल, संजय मुंढे,डॉ. संतोष सावंत, डॉ. नारायण जायभाये, डॉ.बोरीकर,डॉ. कमलाकर कदम क्रीडा संचालक, नू. म. सेलू,प्रा. प्रवीण सोनवणे पर्यवेक्षक, नू. म. सेलू ,प्रा. दयानंद जामगे आदि मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य डॉ.यु. सी. राठोड यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्व खेळाडूंना पटवून दिले. अध्यक्षीय समारोपात डॉ.व्ही.के. कोठेकर यांनी खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळावं असा सल्ला दिला. केवळ जिंकण्यासाठी नाही तर आपल्यातील उत्तम खेळाडूला घडवण्यासाठी खेळत रहावे असे ते पुढे बोलताना म्हणाले.या निमित्त झालेल्या स्पर्धेत महिला गटात ‘ड’ झोन प्रथम तर ‘अ’ व ‘ब’ झोन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला. पुरुष गटात ‘ड’ प्रथम तर ‘क’ व ‘अ’ गट अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पदक प्रदान करण्यात आले.या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ.कमलाकर कदम, प्रा.नागेश कान्हेकर, गणेश माळवे,डॉ. सुरेश उगले,प्रा.रवींद्र कदम, प्रा. विशाल पाटील,प्रा.श्रीकांत देशमुख, प्रा.हेसे,दत्ता रिठे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजाराम झोडगे यांनी केले तर आभार प्रा. नागेश कान्हेकर यांनी मानले.



