अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – आर्णी केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या हस्ते स्थानिक आमदार निधीतून घाटंजी शहरातील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी शहरातील त्या त्या प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.घाटंजी शहरातील पामपट्टीवर ले आउट मध्ये रुपये 80 लाख सिमेंट रोड, घाटी येथे रुपये 15 लाख सिमेंट रोड, अंबादेवी वार्ड राम मंदीर जवळ 10 लाख रुपये सिमेंट रस्ता, नेहरू नगर येथे रुपये 10 लाख सिमेंट रोड, घाटी येथे बैल बाजारसाठी रुपये 10 लाख सिमेंट रोड इत्यादी कामासाठी मंजूर करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठीत नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती सचिन पारवेकर, भाजपाचे घाटंजी तालुकाध्यक्ष सुरेश डहाके, नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे घाटंजी शहराध्यक्ष बाळु उर्फ राम खांडरे, नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रशांत उगले, नगर परिषदेचे माजी सदस्य परेश कारिया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भारत पोतराजे, अंकुश ठाकरे, नाना मस्के, वसंत काळे, बाळ भोंग, प्रमोद गिरी, आमदार डॉ. संदीप धुर्वेचे स्विय सहाय्यक दिलीप पवार, ओम ठाकरे, गिरिधर राठोड, अमित महल्ले, पंकज ठाकरे, संदीप धांदे, मोनू पांडे, विद्याधर राउत, सचिन धांदे, बंडू दोणाडकर, रंजन धांदे, किशोर ठाकरे, उपसरपंच प्रमोद कदम, राजेन्द्र वातीले, किशोर बेले, अभय ठाकरे, विजय कासार, अशोक पेटेवार, प्रभाकर चटुले, सय्यद सद्दू आदीं उपस्थित होते.