सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : बीड जिल्ह्यातील वडवणी या ठिकाणी मटका चालवणाऱ्या टोळीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कारवाई करत अनेक मटका चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बीड शहरात आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शहरांमध्ये राजरोसपणे मटका चालवणारे दिसतात मात्र पोलिस प्रशासन या प्रकाराकडे काना डोळा करत पाठफीरवून जाताना दिसतात. जिल्ह्यातील गल्ली बोळात अनेक अवैध धंद्यांनी थैमान घातले असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिस प्रशासन पाठ फिरवताना किंवा काना डोळा करून निघून जाताना दिसतात. मात्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे नेहमीच त्यांच्या कर्तव्यावर ठाम असतात. बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातील गणेश राजाभाऊ कुळकुटे रा. मारूती नगर हा इसम वैयक्तिक फायद्यासाठी शहरातील लोकांना एकत्र घेऊन विनापरवाना मटका चालवत असल्याची माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना लगेच कारवाई करण्याचे आदेश दिले. दिलेल्या माहितीनुसार कारवाई करत दुपारी ४:३० वाजता छापा मारण्यात आला. यावेळी गणेश राजाभाऊ कुळकुटे आणि इतर लोकांना मटक्याच्या चिठ्यांची छाननी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस कारवाईत गणेश कुळकुटे या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ६५ एजंट कडून १० रूपये टक्क्यांनी कमीशन वर धंदा घेत असल्याची माहिती दिली . तसेच धंद्याची फिरती कटींग ही बीड येथील नितीन खोड या व्यक्तीस देत असल्याची माहिती दिली. पोलिस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून पहिल्यांदाच जिल्ह्यातील ७८ मटका प्रेमींवर वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून २८८४३० रूपयाचा ऐवज जप्त करून कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शिंदे आनंद पोलिस आमदार बालासाहे डापकर दिलीप गित्ते,अनिल मंदे आशा चौरे, शमीम पाशा , गोविंद मुंडे, प्रकाश मुंडे , होमगार्ड चौरे यांनी कारवाई केली.