सुदर्शन गावडे
तालुका प्रतिनिधी,पाटोदा
अंबाजोगाई : येथे जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा 15 ऑक्टोबर रोजी पार पडल्या त्यामध्ये सोनदरा गुरूकुलच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत क्रिकेटचा मॅच जिंकला. व संघाची निवड विभाग खेळण्यासाठी झाली.सोनदरा गुरुकुल संघाला पहिला बाय भेटला त्यामुळे संघाचा प्रवेश सेमी फायनलमध्ये झाला सेमीफायनल केज तालुक्या सोबत झाला चार षटकात केजने 26 धावचे लक्ष दिले व सोनदरा गुरूकुल डोमरी पाटोदाने हे लक्ष 3 षटकात पूर्ण केले . अंतिम सामना माजलगाव या संघाबरोबर झाला. सोनदरा गुरूकुल पाटोदा संघाने 4 षटकात 37 चे लक्ष दिले. लक्ष देत असताना कुणाल झुंबड हा सोनदरा गुरूकुलचा ओपनर फलंदाज होता त्याने संघासाठी एकट्याने 30 धावा केल्या त्यामध्ये चार चौकाराचा समावेश होता. माजलगावला 4 षटकात 32 धावा करता आल्या . तसेच सोनदरा संघाने क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी केली. अमर पवार हा सोनदरा गुरूकुल पाटोदा संघाला विजय मिळून देणारा मुख्य गोलंदाज ठरला. त्याने दोन षटाकात केवळ 06 धावा दिल्या. बीड जिल्ह्यातून 09 तालुक्यातून संघ सहभागी झाले होते . या अगोदर पाटोदा तालुक्याला कधीही क्रिकेट खेळात जिल्हास्तरीय विजय मिळाला नव्हता. संघ जिंकल्यामुळे पाटोदा तालुक्याचा इतिहास घडला आहे.मुलांनी मेहनतीने मिळवलेल्या यशाचे कौतुक पूर्ण पाटोदा तालुक्यातून, सोनदार गुरुकुल परिसरातून, संस्थेचे सर्व पदाधिकारी , शिक्षक वृंद व पालक वर्गातून होत आहे.


