सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी,नांदगाव
नांदगाव : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात खुनाचे सत्र थांबता थांबेना एका महिन्याच्या काळात आज पुन्हा तीसऱ्या खुनाची घटना घडल्याचे उघड झाल्याने न्यायडोंगरी गाव हदरून गेले आहे.मागील काही दिवसांपूर्वी मुलाच्या मदतीने पत्नीने दारुड्या पतीला संपवले ,डॉक्टर पतीने वडिलांच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवले या घटना ताज्या असतानाच आज न्यायडोंगरी येथे अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली आहे.न्याडोंगरी ते परधाडी रोडच्या कडेला असलेल्या शेती गट नंबर 847/3 या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे दगडाने ठेचून त्याचा खून करन्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असुन खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदनासाठी नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मयताची ओळख पटवून या व्यक्तीचा खून कोणी केला व का केला याचा तपास करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड येथील उप विभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, नांदगांव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आपल्या ताफ्यासह घटना स्थळाला भेट देऊन तपासाचे दृष्टीने आवश्यक त्या हलचाली सुरू केल्या आहेत.