चिफ ब्युरो
विनोद कांबळे / मुंबई
मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक व कोकण पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार होऊ ईच्छिणाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात पदवीधारकांनी नोंदणी त्वरीत करावी असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.कोकण भवनातील समिती सभागृहात त्यांनी म्हटले आहे कि भारत निवडणूक आयोगाकडून दि. ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.याघोषित कार्यक्रमानूसार मुंबई पदवीधर,मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर मतदारसंघाची टप्प्या टप्याने नव्याने मतदारयादी तयार करण्यात येणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यमक्रमानूसार दि. २५ ऑक्टोबर२०२३ रोजी मतदार नोंदणी अधिनियम १९६० नुसार वर्तमानपत्रात दिलेल्या नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार आहे.दि. ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी नमुना -१८ किंवा नमुना-१९ द्वारे दावे,हरकती स्विकारणाचा अंतिम दिवस असेल.दि. २०नोव्हेंबर २०२३ रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई करण्यात येईल. दि.२३नोव्हेंबर २०२३ रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येईल. दि.२३ नोव्हेंबर २०२३ ते दि. ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत दावे,हरकती स्विकारली जातील.दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी दावे, हरकती निकाली काढण्यात येतील तसेच पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येईल.दि.३०डिसेंबर २०२३ रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.शिक्षक मतदार संघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तिींची नावे समाविष्ट आहेत.अशा सर्व व्यक्तींना सुध्दा नवीन यादी तयार करतांना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. शिक्षक मतदार संघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे व त्या मतदारसंघाची सर्वसाधारणपणे रहिवासी आहे तसेच जिने दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या ६ वर्षांमध्ये राज्यातील एखादया माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान ३ वर्ष अध्यापनाचे काम केले आहे अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील.तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी सादर केलेल्या नमुना १९मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या ६वर्षांमध्ये एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान ३ वर्ष अध्यापनाचे काम केले असल्याबाबत शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.पदवीधर मतदार संघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तिींची नावे समाविष्ट आहेत.अशा सर्व व्यक्तींना सुध्दा नवीन यादी तयार करतांना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. पदवीधर मतदार संघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे व ती १ नोव्हेंबर २०२३ पुर्वी किमान ३ वर्षे भारताच्या राज्य क्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे.३ वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल व ते विद्यापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधीकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल.नमुना १८ मधील अर्जासोबत पदवीशी समतुल्य म्हणून निर्दिष्ट करण्यात आलेली अर्हता या पुरावा स्वसाक्षांकीत केलेला व अतिरिक्त पदनिर्देशीत अधिकाऱ्यांनी अधिप्रमाणीत करुन जोडणे आवश्यक आहे.खोटे निवेदन ,खोटी माहिती देणारी व्यक्ती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३१ अन्वये शिक्षेस पात्र असेल.नमुना १८ मधील छापील अर्ज मतदार नोंदणी अधिकारी/सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/ पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळविता येईल.हस्तलिखीत टंकलिखीत चक्रमुद्रीत किंवा खाजगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील.
मुंबई विद्यापीठ , खासगी विद्यापीठ यांच्यासह विविध शैक्षणिक संस्था,खासगी आस्थापना यासह विविध पातळीवरुन पदवीधारकांनी नाव नोंदवावे असे आवाहन यावेळी विभागीय आयुक्त यांनी केले आहे.











