अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील शेतातील व गावातील विज पुरवठा नियमित सुरू करण्यात यावे, अशी मागणी पंगडी येथील सरपंच यमुना मेश्राम, प्रमोद काकडे, सदानंद भोयर, माजी सरपंच गजानन काकडे, हनुमान मेश्राम, दिलीप मुनेश्वर, नागोराव मुनेश्वर, गजानन चिंचुरकार, गोलु काळे, रमेश भेदुरकार, नयन उदार, बालु गवळी यासह पंगडी येथील गावकऱ्यांनी विज वितरण कंपनीचे उप विभागीय अभियंता व घाटंजी तहसीलदार यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन घाटंजी तहसीलचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संजय होटे यांना देण्यात आले आहे.
पंगडी येथील शेतातील विज पुरवठा व गावातील विज पुरवठा नियमित सुरू नसुन विज पुरवठ्यात अनियमितता आहे. तसेच कधी कधी विज पुरवठा सुरु असल्यास अर्धा तास सुद्धा सुरू राहत नाही. त्यामुळे पंगडी व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना ओलीत करणे अतिशय कठीण झाले आहे.
तरी पंगडी व इतर परिसरातील शेतातील विज पुरवठा व गावातील विज पुरवठा नियमित व सुरळीत सुरू करण्याची मागणी पंगडी येथील सरपंच यमुना हनुमान मेश्राम व इतर गावकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.