अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 18 ऑक्टोंबर :- घाटंजी तालुक्यात सद्यातरी तीन पत्रकार संघ असुन मराठी पत्रकार बहुउद्देशीय संस्था, घाटंजी तालुका पत्रकार संघ व एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्था असे तीन पत्रकार संघ असुन घाटंजी येथील एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे सचिव संतोष अशोकराव अक्कलवार यांनी सचिव या पदाचा राजीनामा एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास नागोराव कोरवते यांचेकडे सादर केला आहे.
विशेष म्हणजे संतोष अक्कलवार हे दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्राचे घाटंजी तालुका प्रतिनिधी असुन त्यांची 2 ऑक्टोंबर 2023 रोजी सचिव पदी निवड झाली होती. मात्र, एका तथाकथित दैनिकात दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्राचे घाटंजी तालुका प्रतिनिधी तथा एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे सचिव संतोष अक्कलवार विरुद्ध खोटी व बदनामीकारक बातमी प्रकाशित करण्यात आली.
या संदर्भात संतोष अक्कलवार यांनी याची माहिती एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्था कडे दिली. मात्र, सदर तक्रारीनुसार चौकशी अंती न्याय न मिळाल्याने अखेर आपण सचिव पदाचा राजीनामा दिल्याचे संतोष अक्कलवार यांनी सांगितले.
दरम्यान, एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे सचिव संतोष अशोकराव अक्कलवार यांनी एका दैनिकात खोटी व बदनामीकारक बातमी प्रकाशित केल्या बद्दल घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या वरुन यवतमाळ व वर्धा येथील एका वृत्तपत्राचा तथाकथित पत्रकारांविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 500 (अदखलपात्र गुन्हा) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.