अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 18 ऑक्टोंबर – घाटंजी येथील दैनिक मतदार व वर्धा येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक साहसिकचे वार्ताहर (REPORTER) तसेच एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष कज्जुम करीम कुरैशी विरुद्ध भादंवि कलम 384 (खंडणी मागणे) व 385 (खंडणीसाठी धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आरोपी कज्जुम कुरैशी यांस स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख (LCB API DESHMUKH) यांच्या पथकाने आरोपीला यवतमाळच्या दैनिक मतदार कार्यालयाजवळ ताब्यात घेऊन नंतर घाटंजी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. तदनंतर आरोपी कज्जुम कुरैशी यांस घाटंजी पोलीसांनी अटक केली आहे. सदर प्रकरणाचा तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर (POLICE INSPECTOR NILESH SURADKAR) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नागेश खाडे (PSI NAGESH KHADE) हे करित आहे.
दरम्यान, आरोपी कज्जुम कुरैशी यांच्या घराची आज घरझडती घेण्यात आली. घर झडती घेतांना पोलीस उप निरीक्षक नागेश खाडे, पोलीस शिपाई साजीद, पोलीस शिपाई अमोल कोवे, महिला पोलीस शिपाई मेघाली आदीं उपस्थित होते.विशेष म्हणजे आरोपी कज्जुम कुरैशी (ACCUSED KAJJUM QURESHI) यांस आज घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात (JMFC A. A. UTPAT) यांच्या न्यायालयात हजर केले असता घाटंजी पोलीसांनी आरोपीचा तीन दिवसाचा PCR मागीतला होता. मात्र न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारुन MCR दिला. तदनंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात (JMFC A. A. UTPAT) यांच्या न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला. आरोपीची बाजू ॲड. सलीम शाह (यवतमाळ) यांनी न्यायालयात मांडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन बदलु बिसमोरे (SACHIN BADALU BISMORE) याने दैनिक साहसिकचे घाटंजी वार्ताहर कज्जुम कुरैशी याने मला व माझ्या साथीदाला नेहमी पैशाची मागणी करत असल्याने मे महिन्यात रुपये 20,000 व दुसऱ्या वेळी रुपये 5,000 असे एकुण रुपये 25,000 दिले होते.
मात्र, वार्ताहर कज्जुम कुरैशी हा आणखी रुपये 15,000 ची मागणी करत होता. पैसे नाही दिले तर पेपरला(NEWSPAPER) बातमी लावतो, अशी धमकी दिली होती.
आम्ही लपुन छपुन पत्ते खेळत असतो. त्यामुळे आमचे विरोधात कज्जुम हा दैनिक साहसिक (DAILY SAHSIK) या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करत असतो.
दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कज्जुम कुरैशी हा पोलीस स्टेशन चौकात फिर्यादी सचिन बिसमोरे यास भेटला व म्हणाला की, मला रुपये 15,000 द्या व धंदा चालू करा असे फिर्यादीला म्हटले. तसेच आता पेपरला बातमी लावणार नाही, असे कज्जूम ने फिर्यादीला म्हटले.घटना घडल्यानंतर फिर्यादी सचिन बदलु बिसमोरे व त्यांचे दोन साथीदार यांनी घाटंजी पोलीस स्टेशन गाठुन घाटंजी येथील दैनिक साहसिकचे वार्ताहर कज्जुम करीम कुरैशी विरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. या वरुन आरोपी कज्जुम कुरैशी विरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर (POLICE INSPECTOR NILESH SURADKAR) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नागेश खाडे हे करित आहे.तथापि, घाटंजी येथील दैनिक दिव्य मराठीचे वार्ताहर संतोष अक्कलवार यांच्या विरोधात खोटी व बदनामीकारक बातमी प्रकाशित केल्या प्रकरणी संतोष अक्कलवार यांच्या लेखी तक्रारीवरुन घाटंजी येथील दैनिक साहसिकचे वार्ताहर कज्जुम कुरैशी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 500 (अदखलपात्र) अंतर्गत गुन्हा या पुर्वीच नोंदविण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष, शिरोली ग्रामपंचायचे माजी सरपंच, दैनिक देशोन्नतीचे घाटंजी तालुका प्रतिनिधी व घाटंजी येथील एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास नागोराव कोरवते (KAILAS NAGORAO KORWATE) व इतरांविरुद्ध अपराध क्रमांक 227/2016 अन्वये शिरोली येथील विज वितरण कंपनीचे कार्यालय (MSEB OFFICE) तोडफोड केल्या प्रकरणी भादंवि कलम 143, 448, 504, 506 व 427 अंतर्गत घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.तथापि, सदर प्रकरण घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर (JMFC A. A. KALAMKAR) यांच्या न्यायालयात सुरु असुन सद्यातरी सदर केस दोषारोप (CHARGE) साठी प्रलंबित आहे. आरोपी कैलास कोरवते यांचेतर्फे ॲड. अनंतकुमार पांडे हे न्यायालयात काम पाहत आहे.