शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरी केली जाते.त्या निमित्ताने नूतन कन्या प्रशालेची विद्यार्थिनी
कु.प्रतीक्षा छत्रगुण मोगल हिने अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाचा परिचय देत पुस्तकाचे उत्तम विवेचन केले.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापीका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर, वैशाली टकले, अनिल टकले,रेणुका अंबेकर, कीर्ती राऊत यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रास्ताविक भालचंद्र गांजापूरकर यांनी तर अध्यक्षीय समारोप मुख्याध्या पिका संगीता खराबे यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभार कीर्ती राऊत यांनी मानले.