विठ्ठल मोहनकर
तालुका प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लवकरच युवा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने आज दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी पुणे येथे युवा संघर्ष यात्रे संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तर या बैठकीला आमदार रोहित पवार यांच्यासह सेनगांव तालुक्यातील रहिवाशी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कंत्राटी नोकर भरती,अवाजवी परीक्षा शुल्क,रखडलेली भरती प्रक्रिया,तालुका स्तरावर एमआयडीसीची स्थापना, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यासह विविध विषयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी दिली आहे.











