मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : धामणगाव विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बाधवानी आज उपविभागीय कार्यालय समोर मुंडन आंदोलन करत समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाची अंमलबजावणी करून आरक्षण लागू करावे या करीता उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पाठविले.धनगर समाज बांधवांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत मुंडन आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून दिर्घ आश्वासीत व दिर्घ प्रलंबीत, महाराष्ट्र राज्यातील धनगर (धनगड नव्हे) जमात संविधानीक सुचीबध्द असतांना महाराष्ट्र राज्य निर्मीती नंतर अनुसुचीत जमात (एस.टी) आरक्षणा पासुन वंचीत आहे.महाराष्ट्र राज्यातील २ कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर अनुसुचीत जमातीवर महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार यांनी नेहमी अन्याय करून या समाजाला हक्कांच्या आरक्षणपासून वंचित ठेवले या नीतीचा विरोध करत धनगर समाज ह्या मुंडन आंदोलन करत लक्ष वेधत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आमच्या न्याय हक्कांच्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यासाठी निवेदन देत आहोत यावेळी झाडगांव ग्रामपंचायत चे सदस्य प्रफुल्ल ढोक,प्रशांत ज्ञानेश्वर थोटे,प्रफल रुपरावजी ढोल,दिलीप वस्ताराव महाले,मंगेश टाक,लक्ष्मण उघडे,गजानन कडू,डाॅ प्रफुल कापडे,घुरडे चांदूर रेल्वे,अभिजित लांबडे,दिलीप डी. टाक,संजय ढोक व धनगर समाज बांधव उपस्थित होते.











