प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.३ ऑक्टोंबर मंगळवार महाराष्ट्र श्रमिक संघटना व पश्चिम भारत मजदूर अधिकार मंचच्या वतीने काल दि.३ ऑक्टोंबर रोजी ऊसतोड कामगार मुकादम व गाडीवाल्यांचा बेमुदत संप करण्यात आला. तसेच महाराष्ट्र श्रमिक संघटना व पश्चिम भारत मजदूर अधिकार मंचच्या वतीने काही मागण्या मंजूर करण्यासाठी संप व धरणे आंदोलन केले आहे.
१) ऊसतोड कामगारांना ५०० रु. टन प्रमाणे भाव देण्यात यावा. तसेच मुकादम व गाडी मालकाचे कमिशन वाढ करण्यात यावी २) ऊसतोड कामगारांना माथाडी कायदा लागू करावा ३) ऊसतोड कामगारांची नोंदणी सरकारने करून त्यांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजना तात्काळ लागू कराव्यात.४) ऊसतोड कामगारांना आठ तासांपेक्षा जास्तीचे व रात्रीचे धोकादायक काम करण्याची सक्ती करू नये परंतु त्यांनी त्यांच्या राजे खुशीने तसे काम केल्यास त्यांना त्या कामाचा वेगळा मोबदला देण्यात यावा.५) महिला ऊसतोड कामगारांची स्वतंत्र नोंदणी करण्यात येऊन त्यांना ओळखपत्र देण्यात यावे.६) ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा रुपये १०लाखाचा विमा सरकारने काढावा.७) ऊसतोड कामगार व मुकादम च्या मुलांच्या शिक्षणासाठी आश्रम शाळेच्या धर्तीवर कायमस्वरूपी स्वतंत्र निवासी शाळा सुरू करण्यात यावी.८) गायरानातील पिकांचे पंचनामे करून, गायरान धारकांना सातबारा देण्यात यावा.९) संजय गांधी निराधार व इतर तत्सम योजनांच्या लाभधारकाचे अनुदान मासिक रु.३००० करून ते दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे. अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. संपाच्या अनुषंगाने दि.३-१०-२०२३ तहसील कार्यालय पाथरी येथे आंदोलन करण्यात आले दि.९-१०-२०२३ रोजी सेलू कॉर्नर पाथरी येथे सकाळी ११ वाजल्यापासून रस्ता रोको करण्यात येणार आहे सदरील आंदोलनाचे नेतृत्व परभणी जिल्हा ऊसतोड कामगार, मुकादम व गाडी मालक समन्वय समितीचे अरविंद अमदापुरकर, गोविंदा अवचार, अंशीराम खरात, दगडू गालफाडे, जालिंदर घाटूळ, पाराजी कसबे, सर्जेराव तोडके, रंगनाथ खिल्लारे, उमेश खंडागळे, नंदाबाई शेरकर, गोटू गिराम, महानंदा जगताप, ज्ञानोबा वैराळ, पांडुरंग गडकर, मनोहर हिवाळे, बाळासाहेब वैराळ, चंदर आडे, मारुती भाग्यवंत, शालन सरवदे, निलेश कांबळे ,प्रेम झालंरे,भगवान वाघमारे ,हिंदू तांबे, संघप्रिय खंदारे ,रामदास भिसे ,गजानन हिवाळे यांनी मागण्या केल्या आहेत.











