अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : ओंकार फिल्म क्रिएशन निर्मित राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निशांत धापसे दिग्दर्शित अंकुश हा मराठी चित्रपट आता देशभरात ६ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे अकोल्यातील रहवासी असणारा विक्की मंगला मोटे हा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.विक्की मोटे यांनी अत्यंत परिश्रमाने परिस्थितीशी सामना करत चंदेरी दुनियेत आपले स्थान प्राप्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. या अगोदर देखील त्यांनी अत्यंत गाजलेली सैफ अली खान यांच्या प्रमुख भेमिकेत असणारी सॅक्रेट गेम्स 2 आणि मराठी समांतर 2 या वेब सिरीज मध्ये देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यासोबतच अवनी आणि कोण प्रविण तांबे? या हिंदी चित्रपट काम केले आहे. टीव्ही जाहिराती, लघु चित्रपट, मराठी आणि हिंदी नाटकात सुध्दा त्यांनी काम केले असून ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे.मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच आपल्या निर्मितीद्वारे राजाभाऊ घुले यांनी दमदार असे पदार्पण केले आहे. तर के जी एफ या सुप्रसिद्ध चित्रपटात ॲक्शन दिग्दर्शक म्हणून काम केलेले राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विक्रम मोर हे या चित्रपटात देखील ॲक्शन दिग्दर्शकाची भूमिका बजावणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत नृत्य दिग्दर्शनासाठी परिचित असणारे गणेश आचार्य यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.यात कलाकार म्हणून शशांक शेंडे,गौरव मोरे, दीप राज, केतकी माटेगावकर, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, पूजा नायक, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, मंगेश देसाई, सयाजी शिंदे अशा मोठ्या कलाकारांसोबत विशेष भूमिकेत अकोल्यातील विकी मंगला मोटे हे राहणार आहे.तेव्हा या चित्रपटाच्या निमित्ताने विविध स्तरावरून विक्कीचे अभिनंदन केल्या जात आहे. अकोल्यातील नागरिकांनी हा चित्रपट नक्की पहावा असे आवाहन करण्यात येत आहे. तेव्हा डॅा.दादाराव गायकवाड, डॅा. मनोहर वासनिक,प्रा. प्रकाश गवई, प्रा. राहुल माहुरे, प्रा.ॲड. आकाश हराळ, अजिंक्य धेवडे, विशाल नंदागवळी, अमित लोंढे, राहुल कुरे, आदित्य बावनगडे, आकाश जाधव,सुमेध पहुरकर, रोहीत पाटील यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.