संदेश पोहरकार
शहर प्रतिनिधी तेल्हारा
बेलखेड – जगाला मानवतेचा व बंधुत्वाचा आणि शांततेचा संदेश देनारे हज़रत मोहम्मद पैगंबर ( स.अ.) यांच्या जयंती निमित्त सुन्नी नूरानी जामा मस्जिद ट्रस्ट, नौजवाने मोमिनपुरा बेलखेड़ आणि कुरेशी फौंडेशन तेल्हारा यांच्या वतीने बेलखेड़ येथे मोफत आरोग्य शिबी राचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत आरोग्य शिबीरा मध्ये एकुन २२७+ रुग्ण यांनी शिबिराचा लाभ घेतला. सदर आरोग्य शिबिरा मध्ये १०७ महिला व ६५ पुरुष आणि ५५ लहान बालकांनी लाभ घेतला. सदर आरोग्य शिबिरा मध्ये तेल्हारा येथील प्रसिद्ध डॉ. मो. मोहसिन कुरेशी यांनी रुग्णांची मोफत आरोग्य तपासनी केली त्यांना मोफत औषधांचे वाटप केले. नमूद आरोग्य शिबिराचे यशस्वीते करिता सुन्नी नूरानी जामा मस्जिद ट्रस्ट, नौजवाने मोमिनपुरा बेलखेड़ मधील अंसार खाँ पठान, शेख चांद अंसारी, सादिक शाह, अब्दुल मतीन, इमरान ख़ान पठान, शेख मोहसिन, शेख ग्यासोदिन, हाफिज रेहान रज़ा, अब्दुल रशीद मिस्त्री, साबिर बादशाह, उबेद अंसारी, अनवर साहब, अफजल मोमिन, अलनैन व तेल्हारा येथील सबा कुरेशी,मुजाहिद कुरेशी, फार्मासिस्ट शादाब खान, कंपाउंडर शेख अमन सोनू, शेख अयान, सोहेल खान यांनी अथक परिश्रम घेतले.