मोहसिन शेख
शहर प्रतिनिधी वसमत
वसमत तालुका मध्ये मोठ्या प्रमाणात आली आहे ताप व थंडी लक्षणं आहेत अंगावर न काढता डॉक्टर कडे जा व काळजी घ्या आपला परिसर स्वच्छ. ठेवा डासांचा नायनाट करा घ्या सभोवताली पाणी साचू देऊ नका वसमत मध्ये दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे आज बालाजी जींनिंगचे मालक कमल दरक यांची सूनबाई बळी पडली आहे त्यांच्या घरात सर्व लेकरांना डेंग्यू झाला आहे पावसाळा सुरू होताच विविध संसर्ग आणि आजार डोकं वर काडू लागतात. जागोजागी साठलेले पाणी, कचरा, दूषित पाणी, हवा यामुळे आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्याच्या ऋतूत डेंग्यूचा धोकाही वाढतो. हा आजार डासांमुळे पसरतो. त्यामुळे विशेष काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूचा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे, अन्यथा आजार वाढून गंभीर परिणाम सहन करावे लागू शकतात. डेंग्यू हा एक संसर्गजन्य आजार असून, डास चावल्यामुळे तो होऊ शकतो. पावसाळ्यात विशेष काळजी घेतल्यास डेंग्यूच्या प्रकोपासून वाचू शकतो. ताप, अंगदुखी चा त्रास सतत जाणवत राहिल्यास डेंग्यूचा संसर्ग झालेला असू शकतो. अशा परिस्थितीत, जराही वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार सुरू करावेत. पूर्ण आराम करून औषधांचा कोर्स पूर्ण करावा. उपचार मध्यातच सोडल्यास पुन्हा त्रास होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले.


