राजपाल बनसोड
ग्रामीण प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : ईद-ए मीलाद निमीत्त दिग्रस येथे डॉ.ए पी जे अब्दुल कलाम फोरम तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या मध्ये सर्व धर्मीय 60 रक्तदात्यानी रक्तदान केले.या वेळी ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळे देखील वाटप करण्यात आले.या मानवतावादी सामाजिक कार्यासाठी आयोजका सह रक्तदात्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.सामाजिक सुधारणा साठी वाहिलेले संघटन म्हणून परिचित आहे.ईस्लाम धर्माचे अंतीम प्रेषित हजरत मोहम्मद सलमस यांची जयंती अर्थातच ई- ए मिलाद च्या पावन पर्वावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे हे तिसरे वर्ष होते.या वेळी शहर व परिसरातिल सर्व धर्मीय बांधवांना रक्तदान करून एकीचे उदाहरण दिले.साहिल कुबरे ,तुषार राठोड, अमित शहा यांच्या सह 60 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.ग्रामीण रुग्णालयात आयोजित या शिबिराला मृद जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी भेट दिली,तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे,सेवानिवृत शिक्षण अधिकारी प्रमोद सुर्यवंशी,डी व्ही एस पी.मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप मेहता,एपी एम.सी.चे संचालक मिलिंद मानकर,सामाजिक कार्यकर्ते सदानंद आठवले,डॉ.मनोज टेवरे,बाबुसिंग जाधव,विज महामंडळ अभियंता गणेश चव्हाण,कल्पना पवार,माजी नगराध्यक्ष नूरमहम्मद खान,अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आतिक मोलाना,जावेद परसुवाले,रहेमान चौहान,अन्वर धोंगडे,वजीर कोथं मिरे,इम्मी खान,तस्लिम पेठेवाले,जमिल करेशी यांनी सुद्धा भेट दिली.शिबिर आयोजनात ग्रामीण रुग्णालय दिग्रस चे अधिक्षक डॉ.सुरेंद्र आस्वार वेद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रक्त संकलन चमूचे सहकार्य लाभले.मिर्झा अफजल बेग,सय्यद गफ्फार,आमीन नोरंगाबादे,फारुख अहेमद,फिरोज खान,आमीन चौहान,अजीम खान,आसिफ ,शा रिक शेख,आसिफ पठाण,सय्यद अनिस ,नासिर मिर्झा यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

