दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
विक्रमगड : ५ सप्टेंबर हा दिवस माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून देशभर मोठ्या आनंदाने,उत्साहाने साजरा केला जातो.देशातील अनेक शिक्षकांना यादिवशी पुरस्कार देवून गौरविले जाते.अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण,ता.विक्रमगड,जि.पालघर येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो खुर्द गावचे सुपुत्र चेतन रमेश ठाकरे यांना या शिक्षक दिनानिमित्त अनेक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चंद्रपूर यांच्याकडून भारतरत्न डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय पुरस्कार, जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नागमठान छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार, आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्याकडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, मनुष्यबळ लोकसेवा विकास संस्था मुंबई यांच्याकडून राज्यस्तरीय गुरूगौरव सन्मान पुरस्कार, श्री. तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था सोलापूर यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र लातूर यांच्याकडून राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार पत्रकार समिती पनवेल यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, ॲग्रोकेअर ग्रूप अँड कंपनी नाशिक यांच्याकडून कृषी प्रेरणा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच सरांची मागील महिन्यात थायलंड – बँकॉक या परदेशात देखील निवड झाली होती पण त्यांना वैयक्तिक अडचणीमुळे हजर राहता आले नाही. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार येथील प्रकल्प अधिकारी नेहा भोसले,सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय मोरे,आदिवासी सेवा मंडळाचे पदाधिकारी,चारही आश्रम शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद, सर्व कर्मचारी,विद्यार्थी,नातेवाईक,ग्रामस्थ व मित्रपरिवार तसेच पालघर जिल्ह्यामधून ठाकरे यांचे विशेष कौतुक केले जात आहे.