महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : जिल्हा परिषद द्वारे देण्यात येणार शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून भद्रावती तालुक्यातील एका शिक्षकांला पुरस्कार मिळणार आहे. पंचायत समिती भद्रावती अंतर्गत येणाऱ्या माधव शिवाजी हाके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकेवाडा मानकर पंचायत समिती भद्रावती प्राथमिक शिक्षक यांना या सन 2023- 24 वर्षीच्या जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार 5 सप्टेंबर मंगलवार रोजी कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे.