शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : शालेय क्रीडा स्पर्धेत २१ संघाचा सहभाग(सेलू ) विद्यार्थ्यांनी अपयश पचवून यशाच्या दिशेने वाटचाल करावी, मैदानावरील खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या खेळातून आपल्या भविष्याची वाटचाल जाणीव होते. त्यातुनच यशाचा मार्ग मिळतो. असे प्रतिपादन श्रीगजानन सेवाभावी संस्था चे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी केले. क्रीडा व युवक सेवासंचालनाय पुणे, जिल्हाक्राडाधिकारी कार्यालय परभणी, पं.स.गटशिक्षणाधिकारी कार्यालय व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ता. 4 सप्टेंबर रोजी येथील व्हिजन इंग्लिश सेलू येथे आयोजित तालुका स्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या प्रसंगी उद्घाटक म्हणून माजी ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सतिश नावाडे, प्रमुख पाहुणे म्हणून मनिष बोरगांवकर, प्राचार्य हर्षद पांडव,पञकार श्रीपाद कुलकर्णी, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, खरात सर यांची उपस्थिती होती. यास्पर्धेत तालुक्यातील १४,१७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या एकुण २१ संघातील १२६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे सुत्रसंचालन अक्षय घुगे तर गोविंद जाधव यांनी आभार मानले. अंतिम फेरी सामन्यात १४ वर्षे मुलाच्या गटात : स्वामी विवेकानंद विद्यालय सेलू (प्रथम)न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल (व्दितीय).१४ वर्षं मुली गटात:एल .के.आर.आर.प्रिन्स इंग्लिश स्कूल -प्रथम, व्हिजन इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय) १७ वर्षे मुले च्या गटात:-एल .के.आर.आर.प्रिन्स इंग्लिश स्कूल -प्रथम, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल ,द्वितीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षे मुली गटात: नूतन कन्या प्रशाला सेलू( प्रथम) न्यु मॉर्डन इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय).१९ वर्षे मुले: एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू (प्रथम)पंच म्हणून राजेश राठोड, अमर ठाकूर,संगीर फारोकी, अमर सुरवसे, गजानन साळवे, पवार शुभम, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर क्षिरसागर, अभिजित पडघन, तेजस घोडके, अच्युत खुपसे, शुभम काळे, व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.