प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : दि.3 सप्टेंबर रोजी दिगंबर हरिकिशन घटे हे परभणी येथून पंढरपूर कडे रेल ने जाताना दि.3 सप्टेंबर रोजी सकाळी९-३० च्या दरम्यान पंढरपूर येथे गाडीतून उतरताच त्यांच्या पत्नी सौ उज्वला दिगंबर घटे यांना अचानकपणे छातीत दुखू लागल्यामुळे चक्कर आली. त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला .त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये नेताना परत एक तीव्र झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला .काल त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच दिगंबर घटे यांच्या मित्र परिवारामध्ये व स्वकीयांमध्ये हळहळ व्यक्त झाली. सौ उज्वला घटे यांच्या निराने त्यांच्या परिवारावर शोकळा पसरली. काल दि.३ रोजी रात्री अकरा वाजता रामपुरी रत्नेश्वर येथील स्मशानभूमी मध्ये त्यांचा अंत्यविधी पार पडला. पाथरी शहरातील सर्व स्तरातील लोक या अंत्यविधीसाठी एकत्रित झाले होते. सौ उज्वला यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन दिर दोन जावा पुतणे आदी परिवार आहे.


