शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : दि.01जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील माध्यमिक शिक्षीका श्रीमती छाया गायकवाड व सेलू येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयातील प्राथमिक शिक्षक योगेश बळीराम ढवारे यांना राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने शुक्रवारी 01 सप्टेंबर रोजी 2022-2023 या शैक्षणिक वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर केले. त्यात श्रीमती छाया गायकवाड व योगेश ढवारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.राज्यातील 37 प्राथमिक व 39 माध्यमिक, आदीवासी क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणारे 19 प्राथमिक शिक्षक, थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी 8, विशेष शिक्षक कला व क्रिडासाठी 2, दिव्यांग शिक्षक 1, स्काऊटगाईड 2 असे एकूण 108 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.