मोहसिन शेख
शहर प्रतिनिधी वसमत
वसमत:जालना जिल्हा येथील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणावर आपली भुमिका सनदशीर मार्गाने आंदोलन करून बजावणाऱ्या मराठा आंदोलकांना अमानुष मारहाण करण्यात आली, माता भगिनी आणि समाज बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला होता, या घटनेचे पडसाद सबंध राज्यात उमटले असून, सदरील घटनेचा निषेध, निःपक्ष तपास केला जावा आणि दोषी वर कारवाई करण्यात यावी, यासाठी वसमत तालुका दि.04 सप्टेंबर रोजी बंद सकाळी 10 ते 6 वा पर्यंत पाळण्यात येणार आहे.या बाबत आज वसमत शहर पोलीस स्टेशन येथे बंद बाबत बैठक घेण्यात आली यात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके , पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम तसेच सर्व व्यापारी, मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. यामध्ये व्यापारी महासंघाकडून स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवून बंदला पाठिंबा दिल्याच्या जाहीर केले. त्यामुळे वसमत तालुक्यातील सर्व व्यापारी यानी आपले दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यातआले शिवतीर्थावर होणार आंदोलन सकाळीच 10 पासून दुपारी 2 वा शिवतीर्थं वर होणार आंदोलन तर 3 ते 5 वा पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार.यासाठी वसमत तालुक्यात तगडा बंदोबस्त पोलीस प्रशासनातर्फे ठेवण्यात आला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत.


