माझ्या बांधवांसाठी काम करा मी तुमच्या पाठीशी आहे. आमदार सुनिल भुसारा यांचे प्रतिपादन
दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : आदिवासी जिल्हा असेल कि आदिवासी तालुका असेल याभागतील या आधीची परीस्थिती अतिशय बिकट होती आजपासून पंधरा वीस वर्षांपूर्वी या भागात दळणवळणा बरोबरच वीज पाणी अशा अनेक समस्या होत्या त्याच बरोबर येथील आश्रमशाळा शाळा सरकारी कार्यालये यांची स्थिती खुपच दयनीय होती अशा स्थितीत याभागात काम करणारे शिक्षक सरकारी कर्मचारी यांचा मला खरच अभिमान वाटतो कि त्यांनी याही स्थितीत काम केले यामुळे माझ्या आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या विकासासाठी ईमाने ईतबारे काम करणाऱ्या प्रत्येक सरकारी कर्मचारी यांच्या पाठीशी मी कायम उभा राहीन असा शब्द आमदार सुनिल भुसारा यांनी दिला आहे शासकीय आश्रमशाळा घानवळ येथील मुख्याध्यापक सोमनाथ गडाख यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याप्रसंगी आमदार भुसारा बोलत होते.यावेळी भुसारा म्हणाले कि खरतर आजपासून काहि वर्षांपुर्वी याभागात काम करणे खरचं कठीण होते मात्र ग्रामस्थ पालक विद्यार्थी आणि येथील लोकप्रतिनिधी यांनी मोट बांधून असा आश्रमशाळा चालवल्या आजपासून ३४ वर्षांपुर्वी गडाख सरांसारखे अनेक शिक्षक याभागात काम करीत होते आश्रमशाळा शिक्षकांच्या वेदना काय असतात या मला चांगल्या माहिती आहेत कारण माझे वडील सुद्धा आश्रमशाळेचे शिक्षक होते यामुळे मी यानिमित्ताने सर्व सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतानाच वरीष्ठ अधिकाऱ्यांना देखील आवाहन करतो कि आपल्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कोणतीहेर कारवाई करताना पूर्ण चौकशी करावी याच प्रमाणे सेवानिवृत्ती नंतर कार्यालयाकडुन पेंशन किंवा यासारख्या कामासाठी या निवृत्ती कर्मचारी शिक्षकांना मदत करावी त्यांची कामे जाणीवपूर्वक अडवु नये असेही आवहान यावेळी केले.या कार्यक्रमाचे आयोजन आश्रमशाळा व्यवस्थापन आश्रमशाळा कर्मचारी संघटना यांनी केले होते यावेळी राज्य पदाधिकारी सोमनथ शेवाळे आणि त्यांच्या सर्व सहकारीनी मेहनत घेतली यावेळी गडाख कुटुंबियांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या तर विद्यार्थ्यांनी गडाख यांच्या आठवणीना उजाळा दिला यावेळी घानवळ गोंदे ग्रामस्थ माजी विद्यार्थी यांनी गडाख यांचा सत्कार केला यावेळी गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थी शाळा हाच माझा परीवार समजून मी आजवर काम केले एखादा विद्यार्थी आजारी असेल तर माझ मुल आजारी असल्यासारखेच मला भासायचे आज या परीवारापासुन लांब जाताना मला दुख होत असल्याचेहेर त्यांनी सांगितले.यावेळी साहाय्यक शिक्षण प्रकल्पाधिकारी सुभाष परदेशी आदर्श शिक्षक ईश्वर पाटील वैद्यकीय अधिकारी किशोर देसले आदी उपस्थित होते.


