फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
जुन्नर : गणेश एकनाथ चव्हाण, रा. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे हा विना नंबरचे बजाज डिस्कव्हर मोटार सायकल सह ओतुर पोलीस स्टेशन हद्दित फिरताना आढळुन आल्याने त्याचेकडे सदर मोटार सायकल व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यास समाधानकारक स्पष्टिकरण देता आले नाही. त्याने सदर मोटार सायकल ही चोरली असावी किंवा लबाडीने मिळवली असावी अशी खात्री झाल्याने त्याचे विरूद्ध मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ अन्वये कारवाई करणेत आली आहे. नमुद इसम गणेश एकनाथ चव्हाण याचेकडे अधिक चौकशी करता त्याने आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं. २४७/२०२३, भा.दं.वि.क. ३७९ प्रमाणे दाखल मोटार सायकल चोरी गुन्हयाची कबुली दिली आहे. सदरची कारवाई श्री. अंकित गोयल पोलीस अधीक्षक सो., पुणे ग्रामीण, श्री. मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक साो., पुणे ग्रामीण, श्री. रवींद्र चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी सो., जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. एस. व्ही. कांडगे, पो.हवा. नरेंद्र गोराणे ब.नं. २०६५, पो. ना. देवीदास खेडकर ब.नं. २५९२, पो. ना. जनार्दन सापटे ब.नं. ५४३ यांनी केली आहे.


