शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
महागाव : तालुक्यातील लेवा येथून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे तरुण भाविक भगत हे आता उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार असून भाजपाकडून त्यांना उमेदवारीची आशा आहे. भाविक भगत हे २००५ पासून भाजपाचे सक्रिय सदस्य असून २००५ ते २००९ भाजप चे स्थानिक पातळीवर पक्षाच्या मजबूती करण्यासाठी पक्ष संघटन करत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे निवडणुकीमध्ये २००९ मध्ये त्यांनी प्रभारी म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली आहे. २०१० मध्ये त्यांना भाजपा सरचिटणीस म्हणून पक्षाकडून नियुक्ती मिळाली आहे. २०११ मध्ये भाजपा बूथ प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली व त्यांचे काम भरीव राहिले आहे. लोकसभा निवडणूक मतदार संघामध्ये सहा महिने मुक्कामी राहून माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या सोबत सहप्रभारी म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पांढरकवडा लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाचे प्रचारक म्हणून काम केले. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाकडून त्यांची २०१२ रोजी नियुक्ती करण्यात आली तर २०१३ मध्ये भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख नियुक्ती करण्यात आली. नगरपंचायत कळंब, बाभुळगाव निवडणूक मंडळ अध्यक्ष गाव समिती यामध्ये भाजपा पक्षाची महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. वणी विधानसभा पदवीधर मतदार संघात नोंदणी प्रमुख म्हणूनही काम केले. पांढरकवडा नगरपरिषद प्रभारी म्हणून भाजपाकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. भाविक भगत यांची मतदारसंघातील गरीब लोकांची सेवा करून रुग्णसेवक जनसेवक या नावाने एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बीपी शुगर डिलिव्हरी अपघात व इतर अनेक प्रकारचे रुग्ण यांची ते निस्वार्थपणे सेवा करतात. रात्री कितीही वाजता फोन आला ते रुग्णासाठी सदैव तत्पर राहतात. ज्यांना कुठलाही आधार नाही अशा रुग्णांना भाविक भगत यांचाच आधार मिळतो. तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून भाजपाकडून ते उदयास आले. असून आगामी उमरखेड विधानसभेसाठी त्यांची मोर्चे बांधणी जोरात चालू आहे. सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे भाविक भगत यांना भाजप कडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी ची आशा आहे त्या दृष्टीने ते कार्य करत आहेत











