निलेश गोरे
ग्रामीण प्रतिनिधी सोनाळा
सोनाळा येथील बसस्टॉप चे 7 वर्षापूर्वी सौंदर्यीकरण करण्यात आले होते.परंतु आजचे चित्र पाहता जागोजागी खड्डे पडले आहेत.आणि यातच पाऊस सुरू असून गटारीचे जलयुक्त शिवार तयार झाले आहे.येणारे जाणारे प्रवासी, शाळेतील विद्यार्थी,अनेकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी तक्रार देऊन सुध्दा यावर तोडगा निघाला नाही.हे चित्र असेच राहल तर नागरिकांचे आरोग्य तसेच अपघात होण्याची दाट शक्यता होणार हे मात्र खरे.