महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.१९: वरोरा परिवर्तन मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह वरोरा येथे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला पमूख पाहुणे म्हणून लाभलेले शिवसेना जिल्हा प्रमूख नितीनभाऊ मत्ते यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आदर्श बहूऊदेशीय संस्था वरोरा व्दारा संचालित परिवर्तन मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह वरोरा येथील विद्यार्थ्यांना शिवसेना जिल्हा प्रमूख नितीन मत्ते यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच राजेश डांगे शिवसेना शहर प्रमूख वरोरा हे नेहमीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,खेडाचे साहित्य असे नानाविध सामाजिक ऊपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना शहर शाखा तर्पे परिवर्तन मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह वरोरा व सत्य शोधक मागासवर्गीय मुलिंचे वसतिगृहातील १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .तसेच संस्थेचे अध्यक्ष बंडू भाऊ लभाने यांनी वसतिगृहातील १५ ऑगस्ट ला दोन विद्यार्थ्यांचा वाढदिवस असल्यामूळे केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू लभाने प्रमूख पाहुणे नितीन मत्ते शिवसेना जिल्हा प्रमूख चंदपूर शिवसेना शहर प्रमूख वरोरा राजेश डांगे ,वैभव नावडे,वसतिगृहाचे मुख्य कार्यवाहक गणेश बिडवाईक ,जयश्री पोपटकर,अॅडोकेट हिवरकर,अॅडोकेट नकवे,अॅड.साळवे, डाॅ.धांडे,डाॅ.पिसे,प्रदिप लभाने वसतिगृहाचे कर्मचारी वर्ग शालेय विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी व ईतर कर्मचारी उपस्थित होते.


