डॉ. शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
आई-वडीलांच्या चिरंतर स्मृतींसह सामाजिक बांधिलकी चा आदर्श.
सेलू : दि. १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेले श्री नंदकुमार कान्हेकर श्री प्रल्हाद -राव कान्हेकर, श्री राजेंद्र कान्हेकर व त्यांच्या कुटुंबियांनी समाजसेवेच्या माध्यमातून आपल्या आई वडीलांच्या स्मृती चिरंतर स्मरणात राहाव्यात या उद्देशाने येथील शारदा विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ५१ लाख रुपये एवढी देणगी देण्याचा संकल्प केला आहे.ध्वजारोहण समारंभ प्रसंगी श्री प्रल्हादराव कान्हेकर यांनी ११ लाख रुपयांचा पहिला धनादेश संस्थेचे अध्यक्ष श्री मुंजाभाऊ भिसे व सचिव श्री चंद्रप्रकाशजी सांगतानी यांच्या कडे सुपुर्द केला. या प्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री सुनीलराव डख, संचालक श्री रामनाना पाटील, श्री प्रफुल्ल बिनायके, श्री नंदकिशोर बहिवाल, श्री चंद्रशेखर नावाडे,श्री अनुप कान्हेकर,श्रीराम कान्हेकर,मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, बी.आर.साखरे, शिवाजी वाघमारे यांची उपस्थिती होती.
कान्हेकर परिवाराने देणगी देण्यासाठी ज्या शाळेत बहुसंख्येने शेतकरी,शेतमजूर, कामगार,वंचित, गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात अशा शाळेची निवड करून सामान्य कुटुंबातील मुलांनाही सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधांनी सुसज्ज अशा शैक्षणिक संस्थेत दर्जेदार शिक्षण घेता यावे या करीता समाजात एक नवा आदर्श निर्माण करून सेलू शहराच्या शिरपेचात अभिमाना स्पद मानाचा तुरा रोवला आहे. कान्हेकर परिवाराने औदार्य भावनेने केलेल्या सहकार्य मुळे श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व साधारण सभेत शाळेच्या नावात कै. सौ. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालय सेलू असा नामविस्तार करण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला असल्याची माहिती या वेळी प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रशेखर नावाडे यांनी दिली. या प्रसंगी संस्थेच्या वतीने श्री प्रल्हादराव कान्हेकर, अनुप कान्हेकर, श्रीराम कान्हेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुभाष मोहकरे तर मुख्याध्यापक डी.डी.शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीते साठी श्री भरत रोडगे, श्री आर व्ही चव्हाण, श्री एस. एच. चारठाणकर, अभिमान पाईकराव, व्ही बी हिरे, एस.एम.जुमडे,सौ उषा कामठे, सौ.सीमा उंडे, बी.जी.टरपले ,एन.जे.भदर्गे,विजय अंभुरे, भारती मुळे आदींनी परिश्रम घेतले.