महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.17:- स्थानिक गवराळा वॉर्ड भद्रावती येथे ताठे लेआऊट मधील मोकळ्या जागेवर भद्रावती चे नगराधक्ष्य यांचे हस्ते भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी आस्थादाई धनोजे कुणबी समाज तालुका अध्यक्ष मा. पांडुरंग टोंगे व कर्मविर कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य दोहतरेविशेष अतिथी म्हणून
उपस्थित होते.जगन्नाथ महाराज यांच्या भक्तिमार्गातून मंडळाने समाज संघटित करून उत्कृष्ट कार्य करावे तसेच याकरिता तन मन धनाने सर्वोतोपरी व्यक्तिशः सहकार्य करण्याची हमी दिली.. प्रसंगी पांडुरंग टोंगे यांनी आपले मनोगतातून मंदिर निर्मिती प्रक्रियेतील बारकावे विशद करून समनव्य साधून कार्य करण्याचे आवाहन केले. प्राचार्य दोहतरे यांनी धार्मिक कार्यासोबत मंडळाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन समाउपयोगी उत्तरदायित्व निभवावे असे प्रतिपादन केले.व्यासपीठावर प्रामुख्याने बबन पा. डोये, बबन पा. जीवतोडे, बंडू परचाके, बंडू भादेकर यांची उपस्थिती होती.मा. नगराध्यक्ष अनिल धानोरकर व पांडुरंग टोंगे यांचा मंडळाच्या वतीने उचित सत्कार
करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ भक्त लिमेश माणुसमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल ढेंगळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भजन मंडळ स्थानिक नागरिक व जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळाच्या प्रभाकर निमकर, पांडुरंग कोयचाडे, अरुण येरकाडे विलास खापणे, देवराव सातपुते चरनदास येरमे, सूर्यभान परचाके, उमेश व विजय उरकुडे, भोला घाटे, सुभाष चहांदे विनोद सावंनकर व इतर जगन्नाथ भक्तांनी विशेष परिश्रम घेतले