रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा= हिंगणी बुजुर्ग येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कोरडे व मंगेश कोरडे या दोन भावांची केळी इराण देशात विक्री करिता गेली आहे.बॉक्स पॅकिंग मध्ये केळीचे घड टाकून ट्रकद्वारे हिंगणी ते दिल्ली , व नंतर दिल्ली ते इराण अशा प्रकारे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव हिंगणी बू. येथील केळी परत देशात विक्री करीता रवाना होत आहे. आपल्या बारा एकर केळी बागेत सचिन कोरडे या शेतकऱ्याने लाखोचे उत्पन्न मिळवले असल्या मुळे तालुका कृषीअधिकारी गौरव राऊत यांनी त्यांच्या बागेला भेट देऊन सचिन कोरडे यांचे कौतुक केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी परंपरागत शेती सोबतच केळी पपई आदि फळबागांची शेती करून सचिन कोरडे यांच्या सारखे अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी यावेळी केले. हिंगनी बु. येथील शेतकरी सचिन कोरडे यांनी शेती अतिशय काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन असतानाही गेल्या आठ वर्षांमध्ये जाणकाराची मदत घेत व कृषी कार्या लयाच्या सल्ल्या नुसार केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेतले. व लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. त्यांचा नवीन शिकण्याचा ध्यास, उत्तम नियोजन यातून त्यांची केळी परराज्यात म्हणजेच इराण मध्ये पोहोचली आहे. . अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी सचिन कोरडे यांच्याकडे 14 एकर शेती आहे. कोरडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. पारंपारिक पिका ला फाटा देत फळशेतीकडे वळ केला.आजवरच्या शेती प्रवासामध्ये, कामांच्या नियोजनामध्ये त्यांचे काका गणेशराव कोरडे ,,भाऊ मंगेश कोरडे, आई आणि पत्नी चैताली यांची खंबीर साथ मिळाली आहे. पारंपरिकते कडून निर्यातक्षम शेतीकडे पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करताना प्रामुख्याने ऊस, कापूस, कडधान्य पिके यांची लागवड होत असे. त्यातून समाधानकारक उत्पादन मिळत असले तरी नवे प्रयोग करण्याचाप्रयत्न सचिन कोरडे यांनी सुरू केला.. त्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागा तील जाणकार व्यक्तीं कडून शास्त्रीय अद्ययावत माहिती मिळवली. अगदी लागवड, रोपांची निवड, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण आणि मार्केटिंग अशा प्रत्येक बाबी हळूहळू शिकून घेतल्या. आत्मसात केल्या. निर्यातक्षम केळी पिकाचे नियोजन पूर्ण लागवड व केळी पिकाचे उत्तम नियोजन केल्यामुळे घडाची गुणवत्ता उत्तम मिळाली. यावर्षी त्यांची केळी एका खासगी कंपनीने बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल 300 रुपये अधिक दर देत निर्याती साठी केळीची खरेदी केली आहे.
प्रतिक्रिया
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत , कृषी पर्यवेक्षक गजानन नागे ,कृषी सहाय्यक महेश इंगळे,महाराष्ट्र राज्य केळी संघाचे अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण, अतुल नाना पाटील ,राज्य तज्ञ संचालक नामदेव वलेकर हनुमंत चिकणे या सर्व पदाधिकारी , केळी चे व्यापारी , व लहान भाऊ मंगेश कोरडे यांचे सहकार्य मिळाले असे मत सचिन कोरडे यांनी व्यक्त केले.











