डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
पाचोरा येथील पत्रकारावर झालेल्या प्राण घातक हल्ल्या प्रकरणी आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.
सेलू :दि.१७ ऑगस्ट पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोक प्रतिनिधीं कडूनही पत्रकारांवर हल्ले होत असल्याने त्या निषेधार्थ सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सेलू तहसील कार्यालया समोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली तसेच पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिवीगाळ करून दुसऱ्या दिवशी आपल्या गुंडांमार्फत हल्ला चढविला होता या हल्ल्याचा निषेध करून पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार सेलु यांच्यामार्फत एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यभर होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारां- -वरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्ष भरात 37 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे असल्याने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विस्वस्त एस.एम. देशमुख यांच्या
आव्हानानंतर सेलु तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११वाजता सेलु तहसील कार्यालय समोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली व यानंतर पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार कळमनुरी यांच्यामार्फत एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनावर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचीव मोहसिन शेख ,जेष्ट पत्रकार नारायण पाटील काका, कांचन कोरडे, अबरार बेग, मोहमद ईलियास, रामेश्वर बहीरट, निशिकांत रोडगे, राहुल खपले, निसार पठाण,विठ्ठल राऊत, नीरज लोया, संतोष शिंदे, पठान अकबर, कुरेशी जावेद, आदी उपस्थित होते.