डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
परभणी ता.17 पाथरी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार मोहन फड यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ता. 17 नियुक्ती केली.भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माजी आमदार फड यांना महाविजय 2024 या अभियानांतर्गत पाथरी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्तीचे पत्र सादर केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर अँड.व्यंकटराव तांदळे व. प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रमोद वाकोडकर यांच्यासह अन्य नेते मंडळी उपस्थित होती. दरम्यान पाथरी विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल फड यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुरुवारी पाथरी, सोनपेठ, परभणी, मानवत वगैरे भागात फटाक्यांची आतिषबाजी केली व आनंद व्यक्त केला. दरम्यान माजी आमदार फड यांनी आपल्यावर पक्ष श्रेष्ठींनी टाकलेल्या जबाबदारी बद्दल आभार व्यक्त केले.पक्षीय संघटनात्मक बांधणीसह सार्वत्रिक निवडणूकीच्या द्दष्टीने सर्वातोपरी भक्कम तयारी करू असा विश्वास व्यक्त केला.

