कैलास खोटटे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण सक्तीच्या योजनेवर शिक्षण विभागाच्या कार्य कुशल तेवर प्रश्नचिन्ह उद्भवताना दिसत आहे. अशातच संग्रामपूर तालुक्यामध्ये शिक्षण विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य हे धोक्यात आले आहे. बहुल आदिवासी भाग समजला जाणारा सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पुनर्वशीत रोहन खिडकी येथील नागरिकांनी अनेक अर्ज पोवाडे करून सुद्धा शाळाच उपलब्ध करून देत नसल्याने तेथील विद्यार्थ्यांचे भविष्य हे अंधारात दिसत आहे. याचप्रमाणे सोनाळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे शिक्षकाची कमतरता. व जिल्हा परिषद मराठी शाळा सोनाजी नगर येथे विद्यार्थ्यांची संख्या असून सुद्धा शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांची तडका – फडकी दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती केल्याने सोनाजी नगर येथील शाळा समिती व पालक वर्ग यांनी शिक्षण अधिकारी यांना विनंती करून सुद्धा त्यांनी आपला निर्णय हा ठाम ठेवला त्यामध्ये शिक्षण विभागात च्या कामचुकारपणामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षा विना राहणार असल्याचे चित्र सोनाळा विभागात पाहायला मिळत आहे. शिक्षण अधिकारी यांनी संग्रामपूर तालुक्यामधील आदिवासी भागामध्ये फेरफटका न मारता चौकशी न करता तडकाफडकी बदली का केली असावी असा प्रश्न अनेक पालक वर्ग यांना पडत आहे. पालकांनी शिक्षकांना त्याच जागेवर रुजू करावे या मागणीसाठी शिक्षण अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन शिक्षकांना जोपर्यंत परत जागेवर नियुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समिती संग्रामपूर येथे उपोषण करत असल्याचे सांगितले यामध्ये आदिवासी भागातील शाळा प्रश्न तसेच उर्दू शाळेमधील शिक्षक यामध्ये सोनाजी नगर येथील शिक्षकाची केलेली दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती वापस करण्याविषयी 17 ऑगस्ट नंतर पंचायत समिती संग्रामपूर येथे उपोषण करत असल्याचे लेखी पत्र अनेक कार्यालयाला दिले आहे. निवेदन देता वेळी आदिवासी भागातील अनेक आदिवासी व जिल्हा परिषद उर्दू शाळा येथील शाळा समिती अध्यक्ष व सोनाजी नगर येथील पालक वर्ग बहुसंख्येने संग्रामपूर येथे हजर होती.