संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
रावणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण पार पडले या वेळी वैदकिय आधिकरी डॉ. अनिल जोशी, कनिष्ठ सहायक जगदाळे , औषध निर्माण अधिकारी धनंजय बगाडे, आरोग्य सहायक रमेश पानसरे, अप्पा धायतोंडे, परिचारिका सौ.आशा शिंदे , लॅब टेक्निशियन खरात, हनुमंत अडसूळ, रावणगाव ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. अनिल जोशी यांनी घर घर तिरंगा योजने बद्दल माहिती देताना भारतीय तिरंगा मधील तीनही रंग या बद्दल सर्वांना मार्गदर्शन केले. आभार हनुमंत अडसूळ यांनी मानले.










