संतोष भरणे-
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर.
इंदापूर.वर्षानुवर्ष समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर भटकंती करत डोंगरराणावरती सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात आपली मेंढरं जगवत खेचऱ्याच्या पाठीवरती बिर्हाड घेऊन या गावावरून त्या गावावरती भटकंती करणाऱ्या राजेगाव येथील (तालुका दौंड)मेंढपाळ श्री.पप्पु बाबुराव हाके या बांधवांने इंदापूर तालुक्यातील डाळज या गावातील माळरानावरती आपल्या संस्कृती परंपरा आणि उपासना प्रथा यांना कोणतेही फारकत न घेता जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित केला होता मुख्य म्हणजे कोणताही साधन जवळ नसताना असा कार्यक्रम केला की पंचक्रोशीतील नागरिकाकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.आणि दाखवुन दिले कार्यक्रम करण्यासाठी ना जागा ना घर परगावाच्या उजाड माळरानावर कोणतेही साधन नसताना.श्रद्धा असेल तर साधन आपोआप जुळतात आणि कार्यक्रम यशस्वी होतो.
या कार्यक्रमासाठी स्वयंपाकी म्हणून गोसावीवाडी येथील श्री अनंता सांगळे यांनी मोफत काम केले तर स्थानिक गावकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी भरघोस प्रमाणात सहाय्य केले.या जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी हाके कुटुंबीयांचे पाहुणे व स्थानिक ग्रामस्थ नागरिक व युवक बंधूंनी भोजनाचा शेकडो लोकांनी आस्वाद घेतला. जागरण गोंधळ कार्यक्रमात पारंपारिक प्रथेनुसार वाघ्या मुरळी नृत्य तसेच लंगर तोडणे जळ काढणे असे कार्यक्रम करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत पंचक्रोशीतील प्रकाश भरणे , योगेश गावडे ,ग्रामपंचायत सदस्य कळस योगेश(पप्पू) खारतोडे,पै.नवनाथ खारतोडे पै.अवी हगारे ,भाऊसो भरणे, भिवा शेंडगे,रामभाऊ खारतोडे ,विजय खारतोडे आदी मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.